ताईसाहेब पंतप्रधानांना पत्र लिहून लस पुरवठा वाढविण्याचा आग्रह धरा

 ताईसाहेब पंतप्रधानांना पत्र लिहून लस पुरवठा वाढविण्याचा आग्रह धरा

बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा पंकजा मुंडेंना टोलामुंबई : माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यात लसीचा तुटवडा असल्याचे पत्र थेट मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांना पाठवून अप्रत्यक्षरित्या पालकमंत्री धनंजय मुंडे यांना लक्ष्य केले. यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांनीही लगेचच व्टिट करून पंकजा मुंडे यांना टोला लगावला आहे. मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे की, बीड जिल्ह्यात कोव्हिशिल्डचे 6800 व कोव्हॅक्सिनचे 13290 डोस शिल्लक आहेत व कोव्हॅक्सिन केवळ दुसर्‍या डोससाठीच वापरावे असे केंद्राचे निर्देश आहेत. ऑक्सिजन, रेमडीसीवर तसेच लसीकरण यापैकी कोणत्याही उपाययोजनेत अडसर येऊ नये यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. ताई साहेब, मा. मुख्यमंत्र्यांना व मा. आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहिण्याऐवजी पूर्ण माहिती घेऊन एखादे पत्र मा. पंतप्रधानांना पाठवावे व लसींचा पुरवठा वाढविण्याबाबत आग्रह धरावा, जेणेकरून कोरोनाविरुद्धच्या या लढाईत खरोखरच आपली मदत होईल!  

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post