‘या’ गावात निर्बंध असूनही यात्रेला केली मोठी गर्दी...आता करोनाचा उद्रेक झाल्याने पळापळ

 देहऱ्यात कोरोनाचा कहर...११ जण बाधीत  नगर  - नगर तालुक्यातील देहरे गावात मालोबा बालोबा व मागीरंबाबा यांची यात्रा भरते . गावचे ग्रामदैवत असल्याने दरवर्षि या यात्रेत मोठी गर्दि होते . यावेळी कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन प्रशासनाने या यात्रा उत्सवावर बंदी घातली . या संदर्भात देहरे येथे दोन दिवसापूर्वी गावकरी व प्रशासन यांच्यात बैठक झाली . प्रशासनाने यात्रा करण्यास बंदी घातली  . मात्र या बंदीला न जुमानता हजारो भाविक गावात जमा झाले .  यात्रेसाठी ग्रामपंचायतीने ५० लोकांची परवानगी घेतली होती .मात्र या यात्रेत  हजार ते दिड हजार ग्रामस्थानी हजेरी लावली . सध्या कोरोनाची गंभीर परीस्थिती असताना यात्रे साठी मोठी गर्दी झाली .

आज येथील जिल्हा परिषद आरोग्य केंद्रात २१ नागरिकांची कोरोना तपासणी केली असता दहा रुग्णाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले .एक शिगवे नाईक येथे रुग्ण सापडला .२१ पैकी ११ जण बाधीत मिळुन आले आहे .


दोन घरातील रुग्ण कोरोना बाधीत सापडले आहे . तपासणी अजून चालू आहे .२१ पैकी ११ बाधीत आले .हि गंभीर बाब आहे यांच्या संपर्कामध्ये असणाऱ्याची तपासणी करण्याचे बाकी आहे .बंदी असताना यात्रा भरली .अँटी जन तपासणी केली आहे . उद्या पण तपासणी करणार आहेत. " - कल्पना पोहरे ( आरोग्य अधिकारी देहरे )


"ग्रामीण भागातील लग्न कार्यात मोठया प्रमाणात गर्दी होत आहे .सरपंच ग्रामसेवक यांनी लग्नाला गर्दी होणार  नाही याची काळजी घ्यावी . गर्दीमुळे कोरोनाचे रुग्ण वाढत आहे . प्रशासनाने दखल घेण्याची गरज आहे . " रामदास भोर ( माजी सभापती )


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post