सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी... महागाई भत्ता वाढीबाबत केंद्राची नवी भूमिका

 1 जुलै पर्यंत महागाई भत्ता वाढ नाहीनवी दिल्ली : महागाई भत्त्याबाबत केंद्र सरकारने नवं नोटिफिकेशन जारी केलं आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता  1 जुलै 2021 पर्यंत वाढवला जाणार नाही. त्यांना आता जुन्या दरानेच महागाई भत्ता मिळेल. सध्या केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 17 टक्के महागाई भत्ता मिळतो. कोरोनाचं संकट आणि मंदावलेल्या अर्थव्यवस्थेमुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना हा काहीसा फटका आहे.

यापूर्वी केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी संसदेत घोषणा करत, 1 जुलै 2021 पासून महागाई भत्ता अपडेट होईल असं सांगितलं होतं. मात्र आता सरकारने यामध्ये कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे.

1 जानेवारी 2020 पासून महागाई भत्त्यात वाढच केलेली नाही. इतकंच नाही तर सरकारने हे सुद्धा स्पष्ट केलं आहे की, 1 जानेवारी 2020 ते 30 जून 2021 पर्यंत कोणतीही थकबाकी दिली जाणार नाही. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना एरियर्सही मिळणार नाहीत.सध्या महागाई भत्ता 17 टक्के आहे. ज्याला 1 जुलै 2021 पासून 28 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा विचार सुरु आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post