लॉकडाऊन बाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी फडणवीस यांना खोटी माहिती दिली

लॉकडाऊन बाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी फडणवीस यांना खोटी माहिती दिली - चंद्रकांत पाटील पुणे: राज्यात लॉकडाऊन करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस  यांना खोटी माहिती दिल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील  यांनी केला. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात केवळ शनिवार आणि रविवारच्या लॉकडाऊनसंदर्भात चर्चा झाली होती. मात्र, राज्य सरकारने पूर्ण लॉकडाऊनची अधिसूचना जारी केली. जनता ही फसवणूक खपवून घेणार नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. ते मंगळवारी भाजपच्या स्थापनादिनानिमित्त पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी महाविकासआघाडी सरकार हे त्यांच्या कर्माने मरेल, अशा शब्दांत हल्लाबोल केला. तसेच येत्या आठ दिवसांत ठाकरे सरकारमधील तिसऱ्या मंत्र्याला राजीनामा द्यावा लागेल, असा गर्भित इशाराही चंद्रकांत पाटील यांनी दिला. भाजप 2024 च्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर सत्तेत येईल, असा दावाही पाटील यांनी केला

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post