कोविड सेंटरसाठी कोकाटेंनी स्वखर्चाने बसवले ग्रीन नेट, बेडसची संख्या वाढणार

कोविड सेंटरसाठी कोकाटेंनी स्वखर्चाने बसवले ग्रीन नेट, बेडसची संख्या वाढणारनगर : कोरोणाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे चिचोंडी पाटील येथील ग्रामीण रुग्णालयात सुरू असलेल्या कोवीड सेंटरमधील बाधितांची संख्या सातत्याने वाढत असून बेडची संख्या अपुरी पडत आहे.बेड संख्या वाढविण्याच्या दृष्टीने रुग्णालयातील मध्यभागी असलेल्या शेडला ग्रीन नेट बसविणे गरजेचे होते.या संदर्भात  उपजिल्हाधिकारी  अजित थोरबोले, तहसीलदार  उमेश पाटील यांनी केलेल्या  विनंतीस प्रतिसाद देत मा.सभापती .प्रविणदादा कोकाटे यांनी स्वखर्चातून पंचवीस हजार रुपये इतक्या किमतीचे ग्रीन नेट बसविण्याचे काम तातडीने पूर्ण करून घेतले.

     त्यामुळे साधारणपणे तीस बेड संख्या वाढण्यास मदत होणार आहे. याचा मोठा फायदा नगर तालुक्यातील रुग्णांना होणार आहे.या सहकार्याबद्दल मा.सभापती इंजि. प्रविण कोकाटे यांचे उपजिल्हाधिकारी आजीत थोरबोले तहसिलदार श्री.उमेश पाटील,पं.स.आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती मांडगे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.नेवसे,डॉ.कांबळे यांनी आभार व्यक्त केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post