गंभीर स्वरुपाच्या कोविड विरुद्ध कोव्हॅक्सिन 100 टक्के कार्यक्षम

 

गंभीर स्वरुपाच्या कोविड विरुद्ध कोव्हॅक्सिन 100 टक्के कार्यक्षम



मुंबई : देशासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याचं नाव घेत नाहीय. दुसरीकडे देशभरात कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम देखील सुरु आहे. देशात सध्या दोन लसी दिल्या जात आहेत. यातील स्वदेशी लस म्हणून ओळखली जाणारी भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन या लसीचा फेज 3 चाचणीचा अंतरिम निकाल जाहीर केला आहे. यात ही लस डबल म्युटेंटसह कोरोनाच्या सर्व प्रकारांवर 78 टक्के कार्यक्षम असल्याचा अहवाल आयसीएमआरनं दिला आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे कोव्हॅक्सिन लस सध्या घातक असलेल्या कोरोनाच्या डबल म्युटेंटवर प्रभावी असल्याचे आढळले आहे. कोवॅक्सिनची ओव्हरॲाल कार्यक्षमता 78 टक्के तर गंभीर स्वरुपाच्या कोविड विरुद्ध कोव्हॅक्सिन 100 टक्के कार्यक्षम असल्याचं म्हटलं आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post