लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करा, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांचे आदेश

 

लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करा, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांचे आदेश




नगर : नगर जिल्ह्यात करोनाचा फैलाव रोखण्यासाठी कडक निर्बंध जारी केल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी तालुकानिहाय आढावा सुरू केला आहे. आज त्यांनी संगमनेरला भेट देऊन संगमनेर शहरात #प्रशासकीय_यंत्रणा व पोलीस यंत्रणा यांच्या बरोबरीने रस्त्यावर उतरून नागरिकांना काटेकोर लॉकडाउन पाळण्याचे आवाहन केले. नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे पोलीस यंत्रणेला आदेश दिले आहेत. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ दिपाली काळे, संगमनेर विभागाचे प्रांताधिकारी डॉ शशिकांत मंगरुळे, उपविभागीय पोलीस अधिकारी  राहुल मदने, तहसिलदार अमोल निकम,  पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, गटविकास_अधिकारी  सुरेश शिंदे,  नगरपरिषद  मुख्याधिकारी सचिन बांगर उपस्थित होते..



0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post