१२ कोटी लसी एकरकमी घेण्याची महाराष्ट्राची तयारी

 १२ कोटी लसी एकरकमी घेण्याची महाराष्ट्राची तयारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राज्यातील जनतेशी संवाद मुंबई : महाराष्ट्रातील 6 कोटी नागिरकांच्या लसीकरणासाठी 12 कोटी जे डोस आवश्यक आहेत, ते एकरकमी खरेदी करण्याची तयारी महाराष्ट्राची आहे. केंद्राला विनंती आहे, लसीचा साठा उपलब्ध करुन द्या. महाराष्ट्र चांगल्या गोष्टीत एक नंबरवर आहे. कोरोनामुक्तीतही एक नंबर होऊन दाखवू, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र दिन, कामगार दिनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. 1 मे पासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लसीकरण करण्यात येणार आहे. त्याची योजना मुख्यमंत्र्यांनी सांगितली.

उद्यापासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण सुरु होतंय, उद्या पहिली लस दिली जाणार आहे, शेवटची नाही. माझं वचन आहे, माझ्या नागरिकांचं लसीकरण पेलायला आपलं सरकार तयार आहे. आपली पूर्ण तयारी झाली आहे. सुरुवातीला शिस्त येईपर्यंत गोंधळ उडेल, पण तो गोंधळ करु नका

लसीकरण केंद्रावर गर्दी करु नका, नाहीतर कोरोना प्रसारक केंद्र होईल. काळजी घ्या.

आपल्याकडे ३ लाख ४४ हजार लसी आल्या आहेत. त्या लोकसंख्येनुसार वितरित झाल्या आहेत. आपली क्षमता दहा लाखांची दिवसा आहे. आपण पाच लाखांचा टप्पा गाठला आहे. आपण दिवसरात्र मेहनत करुन महाराष्ट्र कोरोनामुक्त करु

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post