दुसरा पर्याय नाही मिळाला तर लॉकडाऊन अटळ.... मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्पष्ट संकेत

 

दुसरा पर्याय नाही मिळाला तर लॉकडाऊन अटळ.... मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्पष्ट संकेतमुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी राज्याला संबोधित केलं.  महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक होत असल्याने, लॉकडाऊनचा धोका टळलेला नाही असं मुख्यमंत्री म्हणाले. आधी जीव वाचले पाहिजे, मग पुढचं बघू, आज पूर्ण लॉकडाऊन इशारा देतोय. पुढील दोन दिवसात दुसरा पर्याय दिसला नाही तर जग जे करतंय तोच पर्याय स्वीकारावा लागेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. 

येत्या काही दिवसात मी तज्ज्ञांशी, पत्रकारांशी बोलेन. मला वेगळा उपाय काय तो सांगा. लॉकडाऊन हा उपाय नाही मान्य. पण संसर्गाची साखळी तोडायची कशी? लसीकरण वाढवा म्हणता, तो वाढवतोच आहे. पण लसीने कोरोना होत नाही असं नाही. जर ही परिस्थिती अशीच राहिली तर आपल्याला परत लॉकडाऊन करायचा की काय ही शक्यता आहे. ती अजूनही टळलेली नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post