जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांटचे काम अंतिम टप्प्यात... राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केली पाहणी

 नगरविकास राज्यमंत्री ना प्राजक्त तनपुरे यांनी घेतला जिल्हा रुग्णालयाचा आढावा 

जिल्हा रुग्णालयास भेट देऊन केली विविध विभागाची पाहणी नगर -  नगरविकास राज्यमंत्री ना प्राजक्त तनपुरे यांनी जिल्हा रुगणालयास भेट देऊन येथील विविध  विभागाची पाहणी केली यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुनील पोखरणा आदी उपिस्थत होते . यावेळी त्यांनी अनेक रुग्नांचे नातेवाईक यांची देखील चोकशी केली. यावेळी बोलताना प्राजक्त तनपुरे म्हणाले कि, जिल्हा रुगणलाय येथे हवेतून ऑक्सिजन तयार करण्याचे प्लँन्ट चे काम अंतिम टप्यात आले आहे. यामुळे लवकर येथील रुग्णांना दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. .ना.तनपुरे गुरुवारी दिवसभर नगर मध्ये होते. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यलय येथे येऊन निवासी उपजिल्हाधिकारी यांची भेट घेऊन जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच जिल्ह्यातील अनेक नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे आता त्यांनी दुसरा डोस घेणे महत्वाचे आहे जिल्ह्यात लसीकरणासाठी जे केंद्र सुरु आहे त्यांची संख्या वाढवण्यात येऊन लसीकरणासाठी आलेले नागरिकांना सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले .
नागरिकांनी नियमाचे पालन करून घरीच राहावे व कोरोनाला हद्दपार करावे असे त्यांनी सांगितले.  

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post