नगरच्या करोना परिस्थितीबाबत केंद्रीय आरोग्य पथकाकडून चिंता व्यक्त

 नागरिकांकडून कोविड प्रतिबंधात्मक नियम पाळले जात नसल्याबद्दल

केंद्रीय आरोग्य पथकाकडून चिंता व्यक्त


 

अहमदनगर:  जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. या परिस्थितीतही नागरिकांकडून कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन केले जात नसल्याबद्दल केंद्रीय आरोग्य पथकाने चिंता व्यक्त केली. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी जाताना चेहर्‍यावर मास्क आणि सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करणे आवश्यक आहे. मात्र, शहरात अनेक ठिकाणी याकडे नागरिकांकडून दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. सध्याच्या वाढत्या कोरोना संसर्गाच्या पाश्वभूमीवर याकडे नागरिकांनी अधिक गांभीर्याने पाहून नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

 

डॉ. एन. गिरीश राव आणि डॉ. सुशील गुरिया या दोन सदस्यांचे केंद्रीय पथक आज कोरोना उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी नगर शहरात दाखल झाले. हे पथक तीन दिवस जिल्ह्यात राहणार असून विविध भागांना भेटी देऊन परिस्थितीची पाहणी करणार आहे. डॉ. राव हे बंगलुरू येथील एनआयएमएचए संस्थेत साथरोगशास्त्रज्ञ आहेत तर डॉ. गुरिया हे दिल्ली येथील एसजेएस संस्थेत वरिष्ठ तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. आज या पथकाने जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले आणि इतर वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा करुन माहिती घेतली. यावेळी पोलीस अधीक्षक मनोज पाटील, मनपा आयुक्त शंकर गोरे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा शल्य चिृकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील, उदय किसवे, डॉ. अजित थोरबोले, जयश्री माळी, जयश्री आव्हाड, रोहिणी नर्‍हे, उज्ज्वला गाडेकर, पल्लवी निर्मळ, जिल्हा साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंके, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वीरेंद्र बडदे, अन्न व औषध प्रशासन अधिकारी अशोक राठोड आदीची यावेळी उपस्थिती होती.

 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post