शासकीय सेवक, पोलिस व‌ त्यांच्या कुटुंबियांसाठी स्वतंत्र कोविड सेंटर सुरू करावं

शासकीय सेवक, पोलिस व‌ त्यांच्या कुटुंबियांसाठी स्वतंत्र कोविड सेंटर सुरू करावं
ॲड.श्याम आसावा यांची मागणीनगर-  करोना काळात शासकीय सेवक, पोलिस कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करत आहेत. त्यांच्या साठी व त्यांच्या कुटुंबियांसाठी स्वतंत्र कोविड केअर सेंटर सुरू करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते ॲड.श्याम आसावा यांनी केली आहे.
याबाबत मुख्यमंत्री तसेच प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
देशात कोरोनाच्या लाटेने थैमान घातले आहे. खर तर कोरोना काळात अनेक शासकीय अधिकारी जिव धोक्यात घालुन काम करत आहेत. दुर्दैवाने यात राज्यातील अनेक शासकीय अधीकारी व कर्मचारींना कोरोना लागन झाली तर काहींना आपले प्राण ही गमवावे लागले आहेत.शिवाय आजही यातील बहुतांशी अधिकारी व कर्मचारी हे कोरोनाचे फैलाव असलेल्या ठिकाणी ड्यूटीवर आहे. गेल्या काही दिवसांपासून अतिशय तणावपूर्ण वातावरणात विशेषतः पोलीस बांधव अविरत कार्य बजावणी करत आहेत. कायदा सुव्यवस्था, गर्दी नियंत्रण, कोरोना नियमांची अंमलबजावणी, शासकीय कार्यालये, अधिकारी, रुग्णालय, लॅबोरेटरी यांना बंदोबस्त असे अनेक कामांचा ताण त्यांच्यावर आहे. कोरोनाचा धोका तर त्यांना आहेच शिवाय कामाच्या ताणामुळे ईतर आजार, मानसिक त्रास ई बळावलेले आहे. अनेक पोलीस तर अनेक दिवसापासून आपल्या कुटुंब जवळ असतांनाही भेटु शकत नाही अशी अवस्था आहे. 

रुग्णालयातील जे कोरोना वार्ड ईतर पेशंट करीता आहेत तेच शासकीय सेवक व पोलींसांसाठी ही आहेत. यातच या शासकीय अधिकारी व कर्मचारींना आपल्या स्वतःच्या कींवा कुटुंबातील सदस्य कोरोना बाधीत झाल्याने औषध उपचार, रुग्णालय मध्ये अॅडमीट होणे, चाचण्या इत्यादी साठी वणवण फिरावे लागत आहेत. त्यांनाच वेळीच उपचारासाठी सुविधा नसल्याने मोठी अडचण होत आहे व उपचारा होण्यापासून वंचित रहावे लागत आहे. 
पोलीस व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्याकरीता स्वतंत्र कोवीड सेंटर उभारणे गरजेचे आहे. या पुर्वी पहिल्या लाटेत आम्ही 02 में 2020 रोजी हि बाब सरकारच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर शासनानेही पोलीसां साठी जिल्हाच्या ठिकाणी स्वतंत्र कोवीड केअर सेंटर स्थापन करण्याचा निर्णय घेत  कारवाई केली.  प्रत्येक जिल्यात पोलीस वसाहती मध्ये कींवा पोलीसांकरीता असलेल्या विश्रामगृहात कींवा ईतर असलेल्या पर्यायी ठीकाणी पोलीस व शासकीय सेवकांसाठी याची व्यवस्था होवु शकते. अहमदनगर मध्ये पोलिस मुख्यालयात पोलीस खात्याचे  मंगल कार्यालय आहे तो ही पर्याय होवु शकतो. शिवाय तेथे पोलिसांसाठी स्वतंत्र दवाखानाही आहे. त्यामुळे उलट ते सोयीचे होईल. अहमदनगर मध्ये आम्ही स्नेहालय संस्थेस जर या पैकी कींवा या अनूशंगाने आपण कोणतीही जबाबदारी दिली तर ती आम्ही आमचे कर्तव्य समजून पार पाडण्यास तयार आहोत. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post