कोविड सेंटर मधील रूग्णांना आमरस पुरणपोळीचे जेवण

कोविड सेंटर मधील रूग्णांना आमरस पुरणपोळीचे जेवण नगर : रामनवमी उत्सवाचे औचित्य साधून शिर्डी येथील कोव्हीड केअर सेंटर मध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना पुरण पोळी आणि आमरसाचे जेवण दिले. खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी यावेळी रुग्णांना जेवण वाढले आणि या महामारीविरुद्ध लढण्याचे बळ मिळावे व रुग्णांचे मनोबल वाढावे या अनुषंगाने संवाद साधत दिलासा दिला.दरम्यान यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रविंद्र ठाकरे, तहसिलदार श्री. कुंदन हिरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद म्हस्के, वैद्यकीय अधिकारी सौ. मैथिली पितांबरे, डॉ. गोकुळ घोगरे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post