खाजगी रुग्णालयमध्ये तात्काळ कॅशलेस सुविधा सुरु करण्यात यावी

 खाजगी रुग्णालयमध्ये तात्काळ कॅशलेस सुविधा सुरु करण्यात यावी  

माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांची जिल्हाधिकारी यांचेकडे निवेदनाद्वारे मागणी नगर- अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोरोना महामारीमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत मात्र खासगी रुग्णालयात कॅशलेस सुविधा देण्यास टाळाटाळ होत असल्यामुळे नागरिकांची अडचण होत आहे .तरी यावर प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी शिवसेना माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांचेकडे केली आहे 
पुढे बोलताना संभाजी कदम म्हणाले, कॅशलेस सुविधा नसल्याने नागरिकांना आर्थिक बोजाचा ताण पडत आहे .त्यात मेडिक्लेम  इन्शुरन्स कंपन्या जो पर्यंत रुग्णालयाचे बील मंजूर करत नाही तो पर्यंत संबंधित रुग्णाला डिस्चार्ज दिला जात नाही .परिणामी रुग्णालयात बेड शिल्लक राहत नाही व वेळही वाया जात आहे ,इतर शहरप्रमाणे अहमदनगर मध्येही कॅशलेस सुविधा मिळून देण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करावेत. त्यामुळे रुग्णाला मोठा दिलासा मिळेल आणि नागरिकांना आर्थिक बोजा सहन करावा लागणार नाही अशी मागणी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली आहे. 
वरील निवेदनचे प्रति राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ,आरोग्य मंत्री राजेश टोपे ,मनपा आयुक्त  ,जिल्हा पोलिस अधीक्षक ,जिल्हा शल्य चिकित्सक आदी देण्यात आले आहे 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post