राज्याला अधिक लस मिळाव्यात याला विरोध आहे का? रोहित पवारांचा फडणवीसांना सवाल

राज्याला तातडीने अधिक लस मिळाव्यात याला विरोध आहे का?  

रोहित पवारांचा फडणवीसांना सवालराष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (rohit pawar) यांनी एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून कोरोना लसीकरण मोहिमेवर भाष्य करत विरोधी पक्षावर निशाणा साधला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी उत्तर प्रदेश आणि राज्याला मिळालेल्या कोरोना लसीच्या तुलनेबाबत केलेल्या विधानाचा रोहित पवार यांनी समाचार घेतला आहे. लस वितरण लोकसंख्येच्या आधारावर होत नसूनही विरोधक महाराष्ट्राची तुलना उत्तर प्रदेशशी करतायेत. केंद्र सरकारच्या गृहितकानुसार वेस्ट रेट हा १०% असू शकतो, पण आपण तो अवघा ३% ठेवला. राज्यातील रुग्णसंख्या बघता लस पुरवठा किती व्हावा, याचा विरोधकांनी विचार करावा, अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.  केंद्राकडून लसींचा पुरवठा वाढवून मिळावा यासाठी प्रयत्न करणं हे राजकारण आहे का? राज्याला तातडीने अधिक लस मिळाव्यात याला विरोध आहे का? या प्रश्नांची उत्तरं राज्याच्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी द्यावीत, असे रोहित पवार म्हणाले. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post