कोविड सेंटर चालकांनी इतकी अमानुषता दाखवू नये, प्रा. भानुदास बेरड यांची पोस्ट

 *खरच माणुसकी हरवली आहे* *आज पहाटेचा अनुभव*आज पहाटे 04.45 वा मोबाइल वाजला, मी  रात्रि कितीही वाजता मोबाइल वाजला तरी आजच्या आणीबाणी प्रसंगी घेत असतो। ग्रामीण भागातील एक कार्यकर्ता बोलत होता, त्यांने सांगीतलेली हकिकत एैकुन धक्का बसला। अहमदनगर मधील एक कोविड सेंटर चा प्रताप त्यांनी सांगीतला।

        परवा सांयकाळी 05.00 वाजता कोविड सेंटर कडुन बेड शिल्लक असल्याचे कळवले असल्याने हे कोविड पेंशट घेऊन मुलगा व इतर नातेवाईक गेले। परंतु टोलवा टोलवी करायला येथे चालका कडुन सुरवात झाली, थोड्याच वेळात बेड खाली होईल असे सांगीतले जाऊ लागले, नातेवाईक ही वाट पाहु लागले, रात्रि 12.00 च्या पुढे बेड शिल्लक नाही हे सांगीतले गेले, पेंशट हॉस्पीटल बाहेर रात्रभर होते, पहाटे पाच पर्यंत, याचे साधे गांभीर्य सुद्धा डॉक्टरांनी दाखवले नाही, म्हणुन मनात प्रश्न निर्माण होतो की *खरच माणुसकी हरवली आहे* *डॉक्टरकीचा पेशा सेवा म्हणुन माणला जातो असे माझे मत होते पण माझा या घटने मुळे पुर्णत: भ्रमनिरास झाला आहे। मी पेंशट ला पुन्हा घरी घेऊन जाण्यास सांगीतले व सकाळी 10.00 वा पेंशट ला दुसर्या हॉस्पीटल ला अँडमिट केले।  

          

मी जाणिव पुर्वक कोविड सेंटर चे नाव घेत नाही, कारण आज बेड मिळत नाही त्यांच चुकल जरी असले तरी त्यांना माफ करु, परंतु कोविड सेंटर चालवणार्या सर्वच चालकांनी इतकी भयानक अमाणुषता दाखऊ नये एवढीच कळकळीची विनंती।


प्रा भानुदास बेरड 

माजी जिल्हाध्यक्ष भाजपा अहमदनगर


अहमदनगर अपडेट्स #कोविड

भाजपा अहमदनगर

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post