एमपीएससी परीक्षा रद्द, आता १० वी, १२ वीच्या परीक्षांबाबतही प्रश्नचिन्ह!

 एमपीएससी परीक्षा रद्द, आता १० वी, १२ वीच्या परीक्षांबाबतही प्रश्नचिन्ह!मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आगामी काळात होणाऱ्या राज्यातील वेगवेगळ्या परीक्षांवरसुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कोरोना संसर्ग वाढत असल्यामुळे या काळात परीक्षांचे आयोजन करणे योग्य नसल्याच्या प्रतिक्रिया अनेक स्तरातून उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेसंदर्भात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. आगामी काही दिवसांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करुन  इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेसंदर्भात योग्य निर्णय घेऊ, असं वर्षा गायवाड यांनी सांगितलंय. 

विद्यार्थ्यांचं आरोग्य हीच विद्यार्थ्यांची प्राथमिकता आहे. विद्यार्थ्यांचं शिक्षण थांबू नये या दृष्टीकोनातून आम्ही विचार करत आहोत. येणाऱ्या काही दिवसांत मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार आहे. त्यानंतर येणाऱ्या काही दिवसांत मी पुन्हा एकदा तुमच्याशी संवाद साधेल, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post