जिल्हा रुग्णालयात आणखी 200 ऑक्सिजन बेडस्ची व्यवस्था करण्यात यावी

 जिल्हा रुग्णालयात आणखी 200 ऑक्सिजन बेडस्ची व्यवस्था करण्यात यावी 

भाजप युवा मोर्चाचे निवेदन


नगर - भाजपा युवा मोर्चाच्यावतीने जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन बेडची संख्या वाढवावी या मागणीचे निवेदन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुनिल पोखरणा यांना देऊन चर्चा  करण्यात आली. याप्रसंगी ज्येष्ठ नेते वसंत लोढा, युवा मोर्चा सरचिटणीस उमेश साठे, चेतन जग्गी, सागर शिंदे, अक्षय उमाप, गणेश निस्ताने, विनायक वैराळ, सुजल नेटके आदि उपस्थित होते.
यावेळी चर्चा करतांना वसंत लोढा म्हणाले की, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सध्या रुग्ण व नातेवाईकांचे मोठे हाल होत आहे. वाढत्या रुग्णसंख्येचा विचार करतांना जिल्हा रुग्णांलयातही ऑक्सिजनयुक्त आणखी 200 बेडस्ची व्यवस्था करण्यात यावी, जेणे करुन रुग्णांना दिलासा मिळेल. कारण  सध्या खाजगी हॉस्पिटलमध्येही ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नसल्याने जिल्हा रुग्णालयाकडे मोठ्या अशाने रुग्ण येत आहेत. परंतु येथेही रुग्णांना जागा मिळत नसल्याने गंभीर परिस्थिती निर्माण  झाली आहे. प्रसंगी रुग्णांचे प्राणही जात आहेत. अशा परिस्थिती जिल्हा रुग्णालयाने आणखी 200 ऑक्सिजन बेड उपलब्ध करावेत, जेणे करुन रुग्णांचा जीव वाचविता येईल. 
याप्रसंगी उमेश  साठे यांनीही जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी याबाबत नियोजन करुन जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन बेडची संख्या वाढविण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न करुन रुग्णांचे प्राण वाचवावेत.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक सुनिल पोखरणा यांनी सांगितले की, जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रुग्णांसंख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न सुरु आहेत. जिल्हा रुग्णालयात सध्या 300 ऑक्सिजन बेडस् असून, रुग्णांच्या आवश्यकतेनुसार त्याची व्यवस्था केली  जाते. आणखी ऑक्सिजन बेड वाढविण्यासाठी विविध पातळ्यावर प्रयत्न सुरु आहेत. जिल्हा रुग्णालयातील सर्वच  स्टाफ  रुग्णांना सेवा देण्यााचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post