लोकांना कारवाईची भिती दाखवून पोलिस करतायत 'वसुली',भाजप जिल्हाध्यक्षांनी केली तक्रार

 

लोकांना कारवाईची भिती दाखवून पोलिस करतायत वसुली ,भाजप जिल्हाध्यक्षांनी केली तक्रारनगर: सध्या कोरोना संसर्गाची परिस्थिती अत्यंत गंभीर असतांना शेवगाव पोलिस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी मात्र या काळात विनाकारण दुकानदार, नागरिक, अत्यावश्यक सेवा देणार्‍या संस्था यांना लक्ष्य करून कारवाईची भिती दाखवत सक्तीने वसुली करत आहेत.

या पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कडक कारवाई करावी, अन्यथा भाजपातर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

याबाबत तक्रारीचे निवेदन जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना दिले असून शेवगाव पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचार्‍यांच्या मनमानी कारभाराची चौकशी करून तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

याबाबत दिलेल्या निवेदनात भाजपा जिल्हाध्यक्ष यांनी म्हटले आहे की, शेवगाव पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी मनमानी कारभार करत आहेत. जिल्ह्यात व राज्यात कोरोना संसर्गाची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. अशा परिस्थितीत आपल्यासह सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून सेवा देत आहेत. मात्र शेवगाव पोलिस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी या काळात विनाकारण दुकानदार, नागरिक, अत्यावश्यक सेवा देणार्‍या संस्थांना लक्ष्य करून कारवाई करण्याची भिती दाखवत सक्तीने वसुली करत आहेत.

दोन दिवसापुर्वी शहरातील संत एकनाथ रुग्णालयासाठी ऑक्सिजनचे 22 सिलेंडर घेऊन जाणारे वाहन शेवगाव पोलिसांनी कुठलीही खातरजमा न करता चौकशीच्या नावाखाली तब्बल दोन दिवस पोलिस ठाण्यात अडकवून ठेवले. त्यामुळे अत्यावश्यक परिस्थितीत रुग्णांच्या जिवीताशी खेळण्याचा हा प्रकार अत्यंत गंभीर आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post