पुनावाला डाकू आहेत, सिरम इन्स्टिट्यूट ताब्यात घ्या, भाजप आमदाराची मागणी

पुनावाला डाकू आहेत, सिरम इन्स्टिट्यूट ताब्यात घ्या, भाजप आमदाराची मागणी



 नवी दिल्ली : सीरम इन्स्टिट्यूटच्या ‘कोविशील्ड’ लसीची किंमत ठरवण्यात आल्यानंतर गोरखपूरच्या भाजप आमदाराने अकलेचे तारे तोडले आहेत. अदर पुनावाला  हे डाकू आहेत. केंद्र सरकारनं साथीचे रोग कायद्या अंतर्गत सीरम इन्स्टिट्यूट ताब्यात घेण्याची मागणी केलीय. भाजप आमदाराच्या या मागणीनंतर एकच खळबळ उडाली आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (SII)कोविशील्ड लशीची नवीन किंमत नुकतीच निश्चित केली आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप आमदाराने हे वक्तव्य केलंय.

सीरमने कोविशील्ड लसीची किंमत ठरवल्यानंतर गोरखपूरचे भाजप आमदार डॉ. राधामोहनदार अग्रवाल यांनी सीरमचे सीईओ अदर पुनावाला यांच्यावर हल्ला चढवलाय. यावेळी अग्रवाल यांनी आपल्या अकलेचे तारे तोडत अदर पुनावाला यांचा डाकू असा उल्लेख केलाय. तर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही कंपनी केंद्र सरकारने ताब्यात घ्यावी अशी मागणीही त्यांनी केलीय. ‘अदर पुनावाला तुम्ही डाकू आहात. पंतप्रधान मोदी, अमित शाह, बी.एल. संतोष, डॉ. हर्षवर्धन यांनी तुमची कंपनी साथ रोग नियंत्रण कायद्या अंतर्गत ताब्यात घेतली पाहिजे’ असं ट्वीट त्यांनी केलंय.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post