कोविड रुग्णांच्या सेवेसाठी सरपंच व सदस्य झाले रूग्णवाहिकेचे सारथी

 भाळवणी गावचे सरपंच व सदस्य झाले रूग्ण वाहिकेचे सारथी

आमदार निलेश लंके यांच्या कडून कामाचे कौतुक


                                          फोटो- विक्रम लोखंडे

नगर - आमदार नीलेश लंके यांनी भाळवणीत सुरू केलेल्या १ हजार १०० बेडच्या शरदचंद्र पवार आरोग्य मंदिरात लंकेे समर्थक प्रामाणिकपणे रुग्णसेवा करीत आहेत. रुग्णवाहीकेवर चालक म्हणून काम करण्यास कोणी धजावत नसताना हिवरे कोरडाचे सरपंच,कामगार नेते दत्ता कोरडे, तसेच भाळवणीचे ग्रामपंचायत सदस्य नितीन विठ्ठल मुरकुटे हे दोघे आमदार लंके प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेवर चालक म्हणून अहोरात्र निःस्वार्थ सेवा करीत आहेत.

भाळवणीच्या आरोग्य मंदिरात पहिल्या ४ दिवसांतच १ हजार १०० पेक्षा जास्त रुग्ण दाखल झाले. काहींना त्रास होऊ लागल्यानंतर त्यांच्या विविध चाचण्या करण्यासाठी नगर किंवा इतर ठिकाणी नेण्यासाठी कोरडे व मुरकुटे हे सज्ज असतात. मागील वर्षी कर्जुले हर्या येथे १ हजार बेडचे शरदचंद्र पवार आरोग्य मंदिर यशस्वीरित्या चालवून तब्बल ४ हजार ५०० पेक्षा जास्त रुग्णांना विनामूल्य सेवा दिल्ल्याबद्दल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमदार नीलेश लंके प्रतिष्ठानला एकसुसज्ज रुग्णवाहीका भेट दिली आहे.

कोरोनामुळे रुग्णवाहीकेसाठी चालक उपलब्ध होत नव्हता. मात्र ती अडचण दत्ता कोरडे व नितीन मुरकुटे यांनी तत्काळ दूर केली. दोघांपैकी एकजण रुग्णाला नगर किंवा इतर ठिकाणी घेऊन जातात. चाचण्या करून पुन्हा आरोग्य मंदिरात आणण्याची जबाबदारीही ते सांभाळतात.

यासह कोरडे व मुरकुटे हे कोविड सेंटरवर पडेल ते काम करण्यासाठीही अहोरात्र सज्ज असतात. रुग्णांची नोंदणी करणे,चहा, नाश्ता, जेवण देणे, स्वच्छतागृहांची सफाई करणे ही कामे ते निःसंकोच करतात. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post