गुड न्यूज...बेडसची उपलब्धता वाढतेय, रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढलं

 

नगर जिल्ह्यात बेडसची उपलब्धता वाढतेय, रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढलंनगर :  करोनाच्या दुसर्या लाटेत नगर शहरासह जिल्ह्यात नवीन बाधितांची संख्या वाढत असली तरी आता रूग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे. याशिवाय लक्षणं नसलेल्या रूग्णांसाठी कोविड केअर सेंटर कार्यान्वित होत आहे. पारनेर मध्ये आ.निलेश लंके यांच्या पुढाकाराने १००० बेडचे कोविड केअर सेंटर सुरू झालं आहे. श्रीगोंदा, कोपरगाव, शिर्डी, जामखेड येथे कोविड केअर सेंटर सुरू आहेत. त्यामुळे तालुकास्तरावर बेड उपलब्धता व विलीनीकरण होत असल्याने नगर शहरात येणारा रुग्णांचा ओघ निश्चितच कमी होण्यास मदत होईल. नगर शहरातही महापालिकेने नटराज हॉटेल, पितळे होस्टेल तसेच शासकीय तंत्रनिकेतन येथे कोविड केअर सेंटर सुरू केले आहेत.

याशिवाय आता रूग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे. रोज सरासरी २ हजार रूग्णांना डिस्चार्ज देण्यात येत आहे. यात नगर शहरातून रोज सरासरी ५०० ते ६०० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात येत आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post