करोनावर 100 टक्के रामबाण आयुर्वेदिक औषध ! पुण्यातील डॉक्टरचा आयुष मंत्रालयाकडे दावा

 करोनावर 100 टक्के रामबाण आयुर्वेदिक औषध ! पुण्यातील डॉक्टरचा आयुष मंत्रालयाकडे दावापुणे : कोरोनाचा उद्रेक पाहता पुण्यात मिनी लॉकडाऊन  लागू करण्यात आला आहे. पुण्यात लसीकरणावरही भर दिला जात आहे. एकीकडे ही परिस्थिती असताना, दुसरीकडे पुण्यातील एका डॉक्टरांनी कोरोनावर आयुर्वेदिक औषध शोधल्याचा दावा केला आहे. इतकंच नाही तर हे औषध कोरोनावर 100 टक्के रामबाण उपाय असल्याचा दावा कोथरुड येथील डॉ. सारंग फडके यांनी केला आहे. टिव्ही 9 ने याबाबत वृत्त दिले आहे.

डॉ. सारंग फडके यांनी कोरोनावर एका नावाने आयुर्वेदिक औषध तयार केलं आहे. या औषधामुळे कोरोनावर 100 टक्के रामबाण उपाय होत असल्याचा त्यांचा दावा आहे. महत्त्वाचं म्हणजे डॉ. फडके यांनी गेल्या वर्षीपासून आपल्याकडे येणाऱ्या रुग्णांना हे औषध देत असून, हे रुग्ण बरे झाल्याचा दावा केला आहे. इतकंच नाही तर त्यांनी या औषधाबाबत आयुष मंत्रालयाशी संपर्क साधून, या औषधाची दखल घेण्याची विनंती केली आहे.0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post