तर नगरमध्येही विनाकारण फिरणार्यांची रस्त्यावरच ॲंटीजेन टेस्ट

 मनपाच्‍या सर्व पक्षिय गटनेत्‍याची कोवीड प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी उपाय योजना बाबत बैठक  महापौर बाबासाहेब वाकळे


 

      शहरामध्‍ये कोवीडचा प्रादुर्भाव वाढत आहे. लक्षण जास्‍त असलेल्‍या रूग्‍णांना दवाखान्‍यामध्‍ये बेड वेळेवर मिळत नाही. रूग्‍णांवर उपचार करण्‍यासाठी मनपाच्‍या वतीने सर्वतोपरी प्रयत्‍न चालू आहे. प्रशासनाकडून देखील प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी प्रयत्‍न सुरू आहेत. कोवीड प्रादुर्भाव रोखण्‍याच्‍या दृष्टिने काय उपाय योजना करता येईल या दृष्टिने .महापौर बाबासाहेब वाकळे यांनी सर्वपक्षीय गटनेत्‍यांची बैठक घेतली. बैठकीत स्‍थायी समितीचे सभापती अविनाश घुले, विरोधीपक्ष नेते तथा गटनेते संपत बारस्‍कर, उपमहापौर मालनताई ढोणे, रोहिणीताई शेंडगे, सुप्रियाताई जाधव, .संजय ढोणे, भाजपा मंडल अध्‍यक्ष अजय चितळे,सतिष शिंदे, सचिन जाधव, अनिल बोरूडे  आदी उपस्थित होते.

     महापौर बाबासाहेब वाकळे म्‍हणाले की, गटनेत्‍याशी चर्चा केली सर्वांचे मत असे आले की, शहरामध्‍ये विनाकारण फिरणा-यांची संख्‍या मोठया प्रमाणात असून याबाबत कडक कार्यवाही होणे आवश्‍यक आहे. तसेच कमी लक्षणे असणारे रूग्‍णांनी डॉक्‍टरांशी संपर्क साधून औषधोपचार घ्‍यावे. अशा रूग्‍णांनी बाहेर फिरू नये, घरात थांबू नये आपल्‍यामुळे आपल्‍या कुटुंबांवर व इतर नागरिकांना त्रास होवू नये याची खबरदारी घ्‍यावी. असे रूग्‍ण वेळेवर दक्षता न घेतल्‍याने त्‍यांना गंभीर समस्‍यांना तोंड दयावे लागत आहे त्‍यामुळे कमी लक्षणे असणा-या रूग्‍णांनी मनपाने सुरू केलेल्‍या कोवीड सेंटरमध्‍ये दाखल होवून वेळीच योग्‍य ते उपचार घ्‍यावे.

      तसेच विना कारण रस्‍त्‍यावर फिरणा-या नागरिकांची रस्‍त्‍यावरच अण्‍टीजन टेस्‍ट करण्‍याची कार्यवाही करण्‍यात येईल. अत्‍यावश्‍यक काम असेल तरच घराबाहेर पडावे. प्रशासनाने देखील विनाकारण फिरणा-या नागरिकांनवर कडक कारवाई करावी.  ऑक्‍सीजनची कमतरता भरून काढण्‍याच्‍या दृष्टिने आज एमआयडीसी अहमदनगर येथील श्री.रमेश लोढा यांच्‍या ऑक्‍सीजन प्‍लॅटला भेट दिली. त्‍या ठिकाणी उदयापासून 600 टाक्‍या ऑक्‍सीजन उपलब्‍ध होणार आहे. अशी माहिती मा.महापौर श्री.बाबासाहेब वाकळे यांनी दिली.

      यावेळी सभापती स्‍थायी समिती मा.श्री.अविनाश घुले म्‍हणाले की, शहरातील नागरिकांना आरोग्‍य चांगले राहील या दृष्टिने प्रयत्‍न होणे गरजेचे असून मनपाच्‍या वतीने कोवीड रूग्‍णांसाठी उपचारासाठी मनपाने नियोजन करावे. रूग्‍णांना चांगली सुविधा व औषधोपचार वेळेत मिळण्‍याच्‍या दृष्टिने कार्यवाही करावी.

      यावेळी विरोधीपक्ष नेते मा.श्री.संपत बारस्‍कर म्‍हणाले की, रूग्‍णांसाठी आवश्‍यक असणारा ऑक्‍सीजनचा तुटवडा जाणवत असल्‍याने मनपाच्‍या वतीने ऑक्‍सीजन प्‍लॅट उभारण्‍यात यावा अशी मागणी केली. तसेच मनपाच्‍या वतीने मोठे रूग्‍णालय उभारावे भविष्‍यामध्‍ये गोरगरिब रूग्‍णांना त्‍यामध्‍ये उपचार घेता येतील अशी कामे भविष्‍याच्‍या दृष्टिने करणे गरजेचे आहे. 

      यावेळी मंडल अध्‍यक्ष मा.श्री.अजय चितळे यांनी मनपाने सुरू केलेल्‍या कोवीड सेंटरमध्‍ये ऑक्‍सीजनचे बेड उपलब्‍ध करून दयावे अशी मागणी केली.

      .

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post