नगर शहरातील अमरधामचे मुख्य गेट बंद

नगर शहरातील अमरधामचे  मुख्य गेट बंदअहमदनगर- नगर शहरातील सर्वात मोठे असलेले अमरधाम चे मुख्य गेट जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या आदेशाने बंद करण्यात आले आहे.कारण कोवीड रुग्णांचा अंत्यविधी वेळी होणारी गर्दी लक्षात घेऊन आणि रुग्णांचे नातेवाईक सर्व विधी करत होते. संबंधित ठेकेदाराचे  लोक ंन ऐकत नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. करोना बाधितांवरील अंत्यसंस्कार करण्यासाठी शासनाने विशिष्ट नियमावली केलेली आहे. त्यानुसार संबंधित कर्मचारी काळजीपूर्वक अंतिम संस्कार करतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून अमरधाममध्ये कोविड मयतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईक जमा होऊन स्वतः सगळे विधी करत आहेत. त्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढण्याची शक्यता असल्याने जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी याप्रकाराची तातडीने दखल घेऊन अमरधामचे मुख्य गेट बंद करून मागील गेटने नातेवाईकांना सुरक्षित अंतरावर थांबवणे बंधनकारक केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post