अजितदादांच्या आपुलकीच्या फोनमुळे प्रशांत गायकवाड भारावले, करोनावर मात करण्यासाठी दिल्या खास टिप्स

 *उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली प्रशांत गायकवाड यांच्या तब्येतीची चौकशी* पारनेर : बाजार समितीचे सभापती व जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड तसेच त्यांच्या पत्नी सोनल या दोघांनाही कोरोनाची बाधा झाल्याने ते सध्या नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.राज्याचे उपमुख्यमंत्री अजित  पवार यांनी सोमवारी सकाळी गायकवाड यांच्याशी फोनवर संपर्क साधत उभयतांच्या तब्येतीची चौकशी केली. आरोग्य तसेच आहाराबाबत सल्लेही दिले. अजित दादांनी केलेल्या चौकशीमुळे गायकवाड दांम्पत्य भारावून गेले असून अजित दादांच्या आशीर्वादाने आम्ही लवकरच कोरोनावर मात करू असा विश्वास प्रशांत व सोनल गायकवाड यांनी व्यक्त केला. प्रशांत गायकवाड  गेल्या आठ दिवसापासून नगरचा मॅक्स केअर रुग्णालयात उपचार घेत आहेत. पती-पत्नी दोघे एकाच रुग्णालयात एकाच खोलीत उपचार घेत असून त्यांच्या प्रकृतीस कोणताही धोका नाही. लवकरच दोघांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे त्यानंतर काही दिवस ते घरीच विश्रांती घेणार आहेत. नगरच्या रूग्णालयात उपचार घेत असताना सोमवारी सकाळी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या देवगिरी बंगल्यावरून  गायकवाड यांच्या मोबाईलवर फोन आला थेट अजित दादा पवार बोलू लागल्याने गायकवाड यांना सुखद धक्का बसला. पवारांनी गायकवाड यांच्या प्रकृतीची चौकशी केली. ऑक्सीजन लेवल काय आहे? एच आर सिटी चाचणी केली आहे का ?कोणते डॉक्टर उपचार करीत आहेत,याबरोबरच कोरोणा रुग्णांनी कोणता आहार घ्यावा कोणते उपचार करावेत याबाबतही अजित दादांनी मार्गदर्शन केले .सध्याचा व्हायरस मागील व्हायरस पेक्षा अधिक धोकादायक आहे त्यामुळे ऑक्सिजनची पातळी कमी होणार नाही याकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याचा सल्लाही पवार यांनी दिला. 

सोशल मीडियावर बोलबाला

रुग्णालयात मुबलक वेळ मिळत असल्याने प्रशांत दादा हे सोशल मीडियावर चांगलेच ऍक्टिव्ह झाल्याचे दिसत आहे. राज्यातील महा विकास आघाडीचा किल्ला लढविताना त्यांचे मित्र असलेले भाजपचे तालुकाध्यक्ष व विरोधक यांनाही घेरण्याची संधी ते सोडत नाहीत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post