टॅंकरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, राहुरी कारखाना परिसरातील घटना

 टॅंकरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, राहुरी कारखाना परिसरातील घटनाराहुरी :राहुरी कारखाना येथील डाँ.तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या पेट्रोल पंपावर डिजेल खाली करण्यासाठी आलेल्या टँकरने पेट्रोल भरुन चालेल्या दुचाकी चालकास समोरुन जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार बापू आसाराम साळुंखे यांचा उपचारापुर्वी मृत्यू झाला.हा अपघात दुपारी 1 वाजता डाँ.तनपुरे कारखाना पेट्रोल पंपाच्या आवारात घडला.

 याबाबत माहिती अशी की, राहुरी कारखाना येथील डाँ.तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या पेट्रोल पंपावर दुचाकीस्वार बापू आसाराम साळुंखे हे टि.व्हीएस स्टार (क्रमांक एम एच 17 ऐयु 4812) मध्ये पेट्रोल टाकुन निघाले असता डिजेल खाली करण्यासाठी आलेला टँकर क्रमांक एम (एच 41 ऐयु 5124)ने दुचाकीस्वारास समोरुन जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार बापू आसाराम साळुंखे (वय42) हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना प्राथमिक उपचारासाठी विवेकानंद नर्सिंग होम मध्ये दाखल केले होते. पुढील उपचारासाठी नगर येथे नेत असताना उपचारापुर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे नगर येथील वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांनी सांगितले.

            राहुरी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असुन अपघात स्थळी शांती चौक मिञ मंडळाचे दिपक ञिभुवन, पिंटु सोनी यांच्यासह शांती चौक मिञमंडळाच्या कार्यकर्त्यांनी मदत केली.


राजेंद्र उंडे 

 प्रतिनिधी राहुरी

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post