10 हजारांची लाच स्वीकारताना पोलिस हवालदार 'एसीबी'च्या जाळ्यात


10 हजारांची लाच स्वीकारताना पोलिस हवालदार 'एसीबी'च्या जाळ्यात नगर - संचारबंदी काळात दारू धंदा सुरळीत सुरू ठेवणे व त्यावर कारवाई न करण्यासाठी 10 हजार रूपयांची लाच घेताना तोफखाना पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार बार्शिकर विलास काळे (वय 50 रा. पाईपलाईन रोड, नगर) याला रंगेहाथ पकडले. नगरच्या लाचलुचपत विभागाने नगर- मनमाड रोडवरील कॉटेज कॉर्नर येथे मंगळवारी सायंकाळी ही कारवाई केली. हवालदार काळे हा गुन्हे प्रगटीकरण शाखेत काम करत होता. विशेष म्हणजे त्याची गुन्हे शाखेत नियुक्ती होऊन अजून महिना देखील झालेला नाही.तक्रारदार यांचा दारु विक्री व्यवसाय आहे. सध्या संचारबंदीमुळे दारू विक्री बंद आहे. दारू विक्री सुरळीत सुरू ठेवणे व त्यावर कारवाई न करण्यासाठी हप्ता म्हणून हवालदार काळे याने तक्रारदाराकडे 15 हजार रूपयांची मागणी केली होती. तक्रारदार यांनी नगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. दिलेल्या तक्रारीवरुन सोमवारी (दि. 26) केलेल्या लाच मागणी पडताळणीत हवालदार काळे याने तक्रारदार यांचेकडे 15 हजार रूपये लाचेची मागणी पंचासमक्ष केली.तक्रारदार यांनी रक्कम कमी करण्यासाठी विनंती केली असता, तडजोडअंती 10 हजार देण्याचे ठरल्याने मंगळवारी (दि. 27) आयोजित लाचेच्या सापळा कारवाई दरम्यान 10 हजाराची लाच पंचासमक्ष कॉटेज कॉर्नर येथे स्विकारताना हवालदार काळे याला रंगेहाथ पकडण्यात आले.पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर अधीक्षक निलेश सोनवणे, पोलीस उपअधीक्षक हरीष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शाम पवरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post