आनंदाची बातमी... देशात १८ वर्षापुढील प्रत्येक जण करोना लसीसाठी पात्र

 

आनंदाची बातमी... देशात १८ वर्षापुढील प्रत्येक जण करोना लसीसाठी पात्रनवी दिल्ली: 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्व जण लसीकरणासाठी पात्र ठरणार आहेत. केंद्र सरकारने याबाबतचा निर्णय घेतला आहे. केंद्राने नुकतीच लसीच्या आयातीलाही परवानगी दिली आहे. त्यामुळे देशभरात करोना लसीकरण गतिमान होण्यास मदत होईल.

कंपन्यांनी एका महिन्यात निर्मिती केलेल्या लसीच्या 50 टक्के लसी सेंट्रल ड्रग्ज लॅबोरेटरीला म्हणजे केंद्र सरकारला द्यायच्या आहेत. उरलेल्या 50 टक्के लसी राज्य सरकार आणि खुल्या मार्केटला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नरेंद्र मोदी यांनी या बैठकीत लसीकरण हेच कोरोना विरुद्धच्या लढाईतील मोठं शस्त्र असल्याचं म्हटलं आहे. डॉक्टरांनी रुग्णांना कोरोनावरील लस घेण्यास प्रोत्साहन द्यावं, असं आवाहन मोदींनी केलं आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post