नगर जिल्ह्यातील रस्त्यांच्या विकास केंद्राकडून सुमारे 84कोटीं 76 लाखचा निधी मंजूर खा. डॉ. सुजय विखे

 अहमदनगर जिल्ह्यातील रस्त्यांच्या विकास केंद्राकडून सुमारे  84कोटीं 76 लाखचा निधी मंजूर


खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांची माहिती
नगर, दि.22– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने अहमदनगर जिल्ह्यातील रस्त्याच्या विकासासाठी 84कोटी76लाख रुपये चा निधी उपलब्ध करुन दिला असल्याची माहिती खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील म्हणाले की, अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील सोनगाव ते चांदेगाव रोड साठी4कोटी91लाख, खरशिंदें ते मांजरी रोड साठी3कोटी94लाख, वरशिंदे ताराबद ते मांजरी रस्त्यासाठी 2कोटी73लाख असे एकुण11कोटी59 लाख रुपयाचे रस्याच्या कामासाठी निधी मंजूर झाला, शेवगाव तालुक्यातील खानापूर ते ठाकूर निमगाव रोड साठी2कोटी73 लाख, पाथर्डी तालुक्यातील धमनगाव,मढी ते कोरडगाव, मालेगाव रस्त्यासाठी 12कोटी88 लाख, पारनेर तालुक्यासाठी गोरेगाव डीसाळ लोणी हवेली, शहांनजापूर सुपा रस्त्यासाठी3कोटी98 लाख,कर्जत तालुक्यातील अरणगाव, वाळकी, देऊळगाव खांडवी रुईगव्हान,कुलधरण,बरडगावन सुद्रीक ते राज्य महामार्ग54 रस्त्यासाठी 3 कोटी 95 लाख, श्रीगोंदा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग161 ते काष्टी, मांडवगणच्या रस्त्यासाठी 12 कोटी65 लाख असे एकूण84कोटी76लाखरुपयाचं निधी मंजूर झाला असलयाचे खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी सांगितले

केंद्र सरकारने अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग साठी भरपूर निधी उपलब्ध करुन  दिल्यामुळे आपण अहमदनगर जिल्ह्यातील जनतेच्या वतीने केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे आभार व्यक्त करतो  अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक वाडी-वस्ती पर्यंत पोहोचेल असे देखील खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यावेळी म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post