भिंगार अर्बन बँकेला 6 कोटीचा नफा

 भिंगार अर्बन बँकेला 6 कोटीचा नफा

लवकरच 300 कोटी ठेवींचा टप्पा पार करणार -चेअरमन अनिलराव झोडगे     भिंगार - मागील शतकाहून अधिक काळापासून समाजिभिमुख कामकाज करुन शहर वासियांची बँकिंग सेवा करीत असलेल्या भिंगार अर्बन बँकेला सरत्या वर्षाअखेर 6 कोटी रुपयांचा ढोबळ नफा झाला असून, बँकेने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन केले आहे. त्यामुळे बँकेला सतत ‘अ’वर्ग मिळत असून, रिझर्व्ह बँकेने ‘ए’ग्रेड दिलेली आहे. आधुनिक बॅकिंग सेवेबरोबरच सर्व खातेदार, कर्जदारांशी असलेल्या सौहार्दपूर्ण कामकाजामुळे बँक सातत्याने प्रगती करत आहे. लवकरच ठेवींचा 300 कोटींचा टप्पा बँक पार करणार आहे. सध्या 150 कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. खातेदारांचा बँकेवरील विश्‍वास संचालक मंडळाचे विश्‍वासपूर्ण काम व कर्मचार्‍यांचे असलेले सहकार्य यामुळेच बँकेची सातत्याने प्रगती होत असल्याचे चेअरमन अनिल झोडगे यांनी सांगितले.

     याप्रसंगी व्हाईस चेअरमन किसनराव चौधरी म्हणाले, बँकेचे चेअरमन स्व.गोपाळराव झोडगे यांच्या निधनानंतर सप्टेंबर 2020 पासून बँकेच्या चेअरमनपदाची धुरा अनिल झोडगे यांनी उत्कृष्टपणे सांभाळली आहे. या दरम्यान त्यांनी सर्वांशी मिळून मिसळून बँक प्रगतीपथावर कशी राहिल, यासाठी सर्व संचालकांच्या मदतीने प्रयत्न केले आहेत.

     बँकिंग व्यवसायाबरोबरच सामाजिक जानविणीवेतून, सभासदांचे हुशार मुलांना प्रोत्साहन देणे, खेळास प्रोत्साहन देणे, आरोग्य शिबीरांचे आयोजन करणे, वृक्षारोपन करणे इत्यादी सामाभिमुख उपक्रम राबविल्यामुळेही बँकेची सर्वांगिण प्रगती होत असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी पांडूरंग हजारे यांनी सांगितले. यावेळी संचालक मंडळ सर्वश्री रमेशराव परभणे, नाथाजी राऊत, राजेंद्र पतके, कैलासराव खरपुडे, संदेशराव झोडगे, विजय भंडारी, विष्णू फुलसौंदर, अमोल धाडगे, एकनाथराव जाधव, श्रीमती तिलोतमाबाई करांडे, श्रीमती कांताबाई फुलसौंदर, नामदेवराव लंगोटे, रामसुख मंत्री, राजेंद्र बोरा आदि उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post