ग्रामीण मूलभूत सुविधा विकास कामांसाठी ५ कोटींचा निधी

 पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण मुलभूत सुविधांच्या विकास कामांसाठी २५/१५ या योजना निधी अंतर्गत ५ कोटी निधी मंजूर!पारनेर तालुक्यातील अनेक ग्रामीण भागातील मुलभुत प्रश्न प्रलंबित असलेल्या मतदारसंघातील कामांना २५/१५ योजना निधी अंतर्गत प्राधान्याने विकास कामांना मंजुरी द्यावी अशी मागणी  केली होती व पाठपुरावा केला.यामध्ये प्रामुख्याने गावांतर्गत रस्ते, गटारे, पाऊसपाणी निचरा ( Storm Water Drainage) दहन व दफन भूमीची सुधारणा करणे, संरक्षक भिंत, ग्राम पंचायत कार्यालय बांधकाम करणे, आठवडी बाजारासाठी सुविधा, गावामध्ये कचरा डेपोसाठी व प्राथमिक प्रक्रियेसाठी सुविधा, सार्वजनिक जागेत वृक्ष लागवड व त्यांचे संरक्षण, सामाजिक सभागृह,समाज मंदिर, सार्वजनिक शौचालय, रस्त्यावर पेव्हिंग ब्लॉक बसविणे, व्यायामशाळा, आखाडा बांधकाम करणे, प्रवासी निवारा शेड, वाचनालय बांधकाम करणे, नदीघाट बांधकाम करणे, बगीचे व सुशोभिकरण, पथदिवे, चौकाचे सुशोभिकरण यासाठी हा निधी वापरता येईल , अशी माहिती आ. निलेश लंके यांनी दिली.

मतदारसंघातील प्रत्येक गावास मुलभुत सुविधा पुरवून विकास कामासाठी कायम आग्रही मागणी केली आहे.0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post