राज्य सरकारकडून 5400 कोटींचे पॅकेज, गोरगरिबांना मोफत धान्य, बांधकाम कामगार,फेरीवाले, रिक्षावाले आदी घटकांना मिळणार पैसे

लॉकडाऊनमध्ये राज्य सरकारकडून 5400 कोटींचे पॅकेज

गोरगरिबांना मोफत धान्य, बांधकाम कामगार,फेरीवाले, रिक्षावाले आदी घटकांना मिळणार पैसेमुंबई: राज्यात उद्यापासून कडक निर्बंध लागू करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गोरगरीबांसाठी महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. राज्यातील गोरगरीबांना निर्बंध लागू झाल्यापासून एक महिना 3 किलो गहू, आणि 2 किलो तांदूळ देण्यात येणार. तसेच शिवभोजन थाळीही महिनाभर मोफत देणार आहे. तसेच सरकारी योजनेचे नोंदणीकृत लाभार्थ्यांना प्रत्येकी 1 हजार रुपये देण्यात येणार असून बांधकाम कामगारांना प्रत्येकी दीड हजार रुपये देण्यात येणार आहे. तसेच अधिकृत फेरिवाल्यांनाही दीड हजार रुपये देणार आहे. परवानाधारक रिक्षाचलाकांनीही दीड हजार रुपये, आणि खावटी योजनेचा लाभ घेणाऱ्या आदिवासींनाही 2 हजार रुपये देण्यात येणार आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध वर्गातील नागरिकांना आर्थिक पॅकेजची घोषणा केली. राज्यातील 7 कोटी लाभार्थींना पुढील 1 महिना 3 किलो गहू 2 किलो तांदूळ देणार. पुढचा एक महिना 2 लाख शिवभोजन थाळ्या मोफत देणार. आधी 10 रुपयांची थाळी 5 केली आता मोफत करणार. ही सरकारची जबाबदारी आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. राज्यातील 35 लाख लोकांना 1000 रुपये आगाऊ देणार, तसेच राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना प्रत्येकी 1500 रुपये देणार. त्याचा 12 लाख कामगारांना उपयोग होणार आहे. आदिवासी कुटुंबाना प्रति कुटंब 2000 रुपये देत आहोत. त्यांची संख्या 12 लाख आहे. त्याशिवाय घरेलू कामगारांनाही आर्थिक मदत देण्यात येणार असून अधिकृत फेरीवाल्यांना 1500 रुपये देणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं.

कोविड संदर्भातील सुविधा उभारणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना अतिरिक्त निधी 330 कोटी कोविडसाठी बाजूला काढून ठेवत आहोत. तसेच या सर्व पॅकेजसाठी 5400 कोटी रुपये निधी बाजूला काढून ठेवले असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post