आज मोठा दिलासा...३ हजारांहून अधिक रुग्णांना डिस्चार्ज

 *दिनांक २२ एप्रिल, २०२१*


*आज ३०६५ रूग्णांना डिस्चार्ज तर  नव्या ३१७६ बाधितांची रुग्ण संख्येत भर*

 

*रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४.०० टक्के*अहमदनगर: जिल्ह्यात आज  ३०६५ रुग्णांना  रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख २४ हजार ६९० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८४.०० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३१७६ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २२ हजार ०६८ इतकी झाली आहे.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ५२८, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १४३४ आणि अँटीजेन चाचणीत १२१४ रुग्ण बाधीत आढळले.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ७३, अकोले ८१, जामखेड २१, कर्जत १५३, कोपरगाव २९, नगर ग्रामीण ०४, नेवासा २२, पारनेर ०१, पाथर्डी ४७, राहता ४४, राहुरी ०२, शेवगाव १९, श्रीगोंदा ११, श्रीरामपूर ०२, कॅंटोन्मेंट बोर्ड ०४ आणि मिलिटरी हॉस्पिटल १३ आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.


खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ४६२, अकोले ५४, जामखेड ०४, कर्जत १३, कोपरगाव ७८, नगर ग्रामीण १०८, नेवासा ३३,  पारनेर २२, पाथर्डी ४६, राहाता १८०,  राहुरी ५२, संगमनेर १९९, शेवगाव २३, श्रीगोंदा ०५, श्रीरामपूर ७३, कॅंटोन्मेंट बोर्ड १८ आणि इतर जिल्हा ६२ आणि इतर राज्य ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.


अँटीजेन चाचणीत आज १२१४ जण बाधित आढळुन आले. मनपा ८०, अकोले ६२, जामखेड ४१, कर्जत १७०,  कोपरगाव ७१, नगर ग्रामीण १११, नेवासा ८३, पारनेर २२,  पाथर्डी ४८,  राहाता ७८, राहुरी १०४, संगमनेर २७, शेवगाव ९६ श्रीगोंदा ११२, श्रीरामपूर ९९, कॅन्टोन्मेंट बोर्ड ०४ आणि इतर जिल्हा ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे.


दरम्यान, आज  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये

मनपा ६५७, अकोले १४६, जामखेड ७९, कर्जत १९०,  कोपरगाव १७७, नगर ग्रामीण १६७, नेवासा १३१, पारनेर १३२, पाथर्डी १९५, राहाता ३५२, राहुरी १०६, संगमनेर २६७,  शेवगाव ११४,  श्रीगोंदा १०५,  श्रीरामपूर १६५, कॅन्टोन्मेंट ४२, मिलिटरी हॉस्पिटल १० आणि इतर जिल्हा २७ आणि इतर राज्य ०३  अशा रुग्णांचा समावेश आहे.


*बरे झालेली रुग्ण संख्या:१,२४,६९०*


*उपचार सुरू असलेले रूग्ण:२२०६८*


*मृत्यू:१६८८*


*एकूण रूग्ण संख्या:१,४८,४४६*


(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)


*घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा*


*प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा*


*स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या*


*अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा*

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post