रूग्ण बरे होण्याबाबत दिलासा कायम...आज'इतक्या'हजार रूग्णांना डिस्चार्ज

 *दिनांक २८ एप्रिल, २०२१*


*आज ३११७ रूग्णांना डिस्चार्ज तर  नव्या ३१२२ बाधितांची रुग्ण संख्येत भर*

 

*रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.३६ टक्के*अहमदनगर: जिल्ह्यात आज  ३११७ रुग्णांना  रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४३ हजार ५२८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५.३६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३१२२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २२ हजार ७०५ इतकी झाली आहे.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १०६७, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ११७८ आणि अँटीजेन चाचणीत ८७७ रुग्ण बाधीत आढळले.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १०१, अकोले ३१, जामखेड ८२, कर्जत १०६, कोपरगाव ४५, नगर ग्रामीण ५०, नेवासा १८, पारनेर १११, पाथर्डी ११८, राहता ३१, राहुरी ६४, संगमनेर ९३, शेवगाव १५२, श्रीगोंदा ३०, श्रीरामपूर ०६, कॅंटोन्मेंट बोर्ड १२, मिलिटरी हॉस्पिटल १२ आणि इतर जिल्हा ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे.


खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ३९७, अकोले १०, जामखेड ०२, कर्जत २२, कोपरगाव ५५, नगर ग्रामीण १३२, नेवासा २५,  पारनेर ३४, पाथर्डी ४६, राहाता १४९,  राहुरी ३५, संगमनेर १०४, शेवगाव २६, श्रीगोंदा २३, श्रीरामपूर ८१, कॅंटोन्मेंट बोर्ड २५ आणि इतर जिल्हा १२ अशा रुग्णांचा समावेश आहे.


अँटीजेन चाचणीत आज ८७७ जण बाधित आढळुन आले. मनपा ८५, अकोले ०५, जामखेड २५, कर्जत ०२, कोपरगाव २३, नगर ग्रामीण ६३, नेवासा ५२, पारनेर १५५,  पाथर्डी १०,  राहाता १२४, राहुरी ७९, संगमनेर ४३, शेवगाव २५ श्रीगोंदा १३५, श्रीरामपूर ३१, कॅंटोन्मेंट १७ आणि इतर जिल्हा ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.


दरम्यान, आज  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये

मनपा ८९८, अकोले १३३, जामखेड १०९, कर्जत १६९,  कोपरगाव ७६, नगर ग्रामीण ३६८, नेवासा १०६, पारनेर १५७, पाथर्डी १२०, राहाता २४९, राहुरी १३६, संगमनेर १२८,  शेवगाव ५३,  श्रीगोंदा ८६,  श्रीरामपूर २२५, कॅन्टोन्मेंट ४०, मिलिटरी हॉस्पिटल २६, इतर जिल्हा ३५ आणि इतर राज्य ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.


*बरे झालेली रुग्ण संख्या:१,४३,५२८*


*उपचार सुरू असलेले रूग्ण:२२७०५*


*मृत्यू:१९१९*


*एकूण रूग्ण संख्या:१,६८,१५२*


(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)


*घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा*


*प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा*


*स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या*


*अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा*

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post