करोना झाला अनब्रेक, २४ तासात ३ हजारांहून अधिक बाधित

 करोना झाला अनब्रेक, २४ तासात ३ हजारांहून अधिक बाधितनगर- राज्यात ब्रेक द चेन सुरू झाली असली तरी  नगर जिल्ह्यात करोना अनब्रेक झाला आहे. गेल्या वर्षभरातील सर्वाधिक आणि धडकी भरवणारी रुग्णवाढ मागील २४ तासात झाली आहे. जिल्ह्यात तब्बल ३०९७ नवीन बाधितांची भर पडली आहे. यात सर्वाधिक ६७५ रूग्ण‌नगर शहरात आढळून आले आहेत. 

नगर मनपा ६७५, राहाता ३५२, संगमनेर २६७, पाथर्डी १९५, कर्जत १९०, कोपरगाव १७७, नगर ग्रामीण १६९, श्रीरामपूर १६५, अकोले १४७,  नेवासा १३४, पारनेर १३३, शेवगाव ११४, राहुरी १०७, श्रीगोंदा १०७, जामखेड ७९,  भिंगार छावणी मंडळ  ४६, इतर जिल्हा २७, मिलिटरी हॉस्पिटल १०, इतर राज्य ३, असे रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्हा रुग्णालयाच्या लॅब मध्ये ८७१, खाजगी लॅब मध्ये ८२९, तर ॲंटीजेन टेस्टमध्ये १३९७ बाधित आढळून आले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post