दुस-या दिवशीही दिलासा...आज 'इतक्या' हजार नवीन बाधितांची भर

 

नगर- सक्तीच्या लॉकडाऊनचे सकारात्मक परिणाम दिसण्यास सुरुवात झाली असून नगर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी करोनाचा आलेख काही प्रमाणात खाली आला आहे. मागील २४ तासात जिल्ह्यात 2795 नवीन बाधितांची भर पडली आहे. नगर शहरांतही रुग्ण किंचित घटले असले तरी जिल्ह्यात सर्वाधिक रूग्ण शहरातच आहे. 

 

नगर मनपा 650, राहाता 216, संगमनेर 139, पाथर्डी 94, कर्जत 160, कोपरगाव 115, नगर ग्रामीण 282 , श्रीरामपूर 229, अकोले 90,  नेवासा 184, पारनेर 145, शेवगाव 108, राहुरी 158, श्रीगोंदा 105, जामखेड 27,  भिंगार छावणी मंडळ  21, इतर जिल्हा 71, मिलिटरी हॉस्पिटल 00, इतर राज्य 01, असे रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्हा रुग्णालयाच्या लॅब मध्ये 608, खाजगी लॅब मध्ये 691, तर ॲंटीजेन टेस्टमध्ये 1496 बाधित आढळून आले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post