करोनाचा धडकी भरवणारा ‘उच्चांक’, जिल्ह्यात आज ‘इतक्या’ हजार नवीन रूग्णांची भर

 


करोनाचा धडकी भरवणारा ‘उच्चांक’, जिल्ह्यात आज ‘इतक्या’ हजार नवीन रूग्णांची भर



नगर : मिनी लॉकडाउनच्या निर्बंधानंतरही करोनाचा प्रादुर्भाव थांबण्यास तयार नसून आज पुन्हा नगर जिल्ह्यात धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली आहे. नगर जिल्ह्यात चोवीस तासात 2233 नवीन बाधितांची भर पडली आहे. यात सर्वाधिक 611 रुग्ण नगर शहरात आढळून आले आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे- नगर मनपा- 611, कर्जत201, संगमनेर-198, नगर ग्रामीण-187, अकोले-128, राहाता-117, पाथर्डी-114, राहुरी-107, शेवगाव-103, कोपरगाव-99, श्रीरामपूर-79, पारनेर-70, नेवासा-55, भिंगार छावणी मंडळ-54, जामखेड-47, श्रीगोंदा-40, इतर जिल्हा-17, मिलिटरी हॉस्पिटल-6. जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 859, खासगी लॅबमध्ये 549 तर रॅपिड अँटीजेन टेस्टमध्ये 825 नवीन बाधित आढळून आले आहेत. (स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)


*घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा*


*प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा*


*स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या*


*अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा*

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post