लॉकडाऊनलाही करोना दाद देईना.., जिल्ह्यात आज ‘इतक्या’ हजार नवीन रूग्णांची भर

 लॉकडाऊनलाही करोना दाद देईना.., जिल्ह्यात आज ‘इतक्या’ हजार नवीन रूग्णांची भरनगर : लॉकडाउनच्या कडक निर्बंधानंतरही करोनाचा प्रादुर्भाव थांबण्यास तयार नसून आज पुन्हा नगर जिल्ह्यात दोन हजारांहून अधिक रूग्ण आढळून आले आहेत. नगर जिल्ह्यात चोवीस तासात 2210 नवीन बाधितांची भर पडली आहे. यात सर्वाधिक 534 रुग्ण नगर शहरात आढळून आले आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे- नगर मनपा- 534, कर्जत- 150, संगमनेर-163, नगर ग्रामीण-115, अकोले-111, राहाता-183, पाथर्डी-60, राहुरी-140, शेवगाव-107, कोपरगाव-87, श्रीरामपूर-162, पारनेर-105, नेवासा-87, भिंगार छावणी मंडळ-50, जामखेड-81, श्रीगोंदा-51, इतर जिल्हा-10, मिलिटरी हॉस्पिटल-14. जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 960, खासगी लॅबमध्ये 884 तर रॅपिड अँटीजेन टेस्टमध्ये 766 नवीन बाधित आढळून आले आहेत. 


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post