मोठा दिलासा...सलग दुसऱ्या दिवशी विक्रमी डिस्चार्ज

 *दिनांक १७ एप्रिल, २०२१*


*आज २१७१ रूग्णांना डिस्चार्ज तर  नव्या ३२८० बाधितांची रुग्ण संख्येत भर*

 

*रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४.७५ टक्के*अहमदनगर: जिल्ह्यात आज २१७१ रुग्णांना  रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख १२ हजार ३३० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८४.७५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३२८० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १८७२७ इतकी झाली आहे.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ७९८, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ८०८ आणि अँटीजेन चाचणीत १६७४ रुग्ण बाधीत आढळले.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २१४, अकोले ६१, जामखेड ०२, कर्जत ४४, कोपरगाव १०, नगर ग्रामीण ४०, नेवासा २६, पारनेर २६, पाथर्डी २१, राहता ७९, राहुरी २६, संगमनेर ५०,  शेवगाव ८९, श्रीगोंदा ११, श्रीरामपूर ४१, कॅंटोन्मेंट बोर्ड ४१, मिलिटरी हॉस्पिटल १३ आणि इतर जिल्हा ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.


खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ३७९, अकोले ०६, जामखेड ०७, कर्जत ०७, कोपरगाव ३१, नगर ग्रामीण ४२, नेवासा ०८,  पारनेर ०९, पाथर्डी १०, राहाता ८६,  राहुरी १५, संगमनेर ७३, शेवगाव १३, श्रीगोंदा ०७, श्रीरामपूर ६५, कॅंटोन्मेंट बोर्ड १३ आणि इतर जिल्हा ३७ अशा रुग्णांचा समावेश आहे.


अँटीजेन चाचणीत आज १६७४ जण बाधित आढळुन आले. मनपा २९४, अकोले ७०, जामखेड ३९, कर्जत १८५, कोपरगाव १११, नगर ग्रामीण २५९, नेवासा ६१, पारनेर ६६, पाथर्डी ६७,  राहाता ११५, राहुरी १४५, संगमनेर ६१, शेवगाव ६२, श्रीगोंदा २८, श्रीरामपूर ८३, कॅन्टोन्मेंट बोर्ड १४ आणि इतर जिल्हा १४ अशा रुग्णांचा समावेश आहे.


दरम्यान, आज  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये

मनपा ५२०, अकोले १११, जामखेड ८०, कर्जत १४९,  कोपरगाव ८४, नगर ग्रामीण ११३, नेवासा ८५, पारनेर १०३, पाथर्डी ५७, राहाता १८२, राहुरी १४०, संगमनेर १६३,  शेवगाव १०७,  श्रीगोंदा ५१,  श्रीरामपूर १५३, कॅन्टोन्मेंट ४९, मिलिटरी हॉस्पिटल १४ आणि इतर जिल्हा १० अशा रुग्णांचा समावेश आहे.


*बरे झालेली रुग्ण संख्या:१,१२,३३०*


*उपचार सुरू असलेले रूग्ण:१८७२७*


*मृत्यू:१४८०*


*एकूण रूग्ण संख्या:१,३२,५३७*


(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)


*घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा*


*प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा*


*स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या*


*अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा*

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post