करोनाचा सर्वोच्च कहर, ‘इतक्या’ हजार नवीन रूग्णांची भर

 


करोनाचा सर्वोच्च कहर, ‘इतक्या’ हजार नवीन रूग्णांची भर



नगर : नगर जिल्ह्यात करोनाचे थैमान कायम असून चोवीस तासात सुमारे 2 हजार नवीन बाधित आढळून आले आहेत. मागील चोवीस तासात जिल्ह्यात तब्बल 1996 नवीन रूग्णांची भर पडली आहे. यात सर्वाधिक रूग्ण नगर शहरात आढळून आले आहेत. नगर शहरात चोवीस तासात 476 बाधितांची भर पडली आहे. अहमदनगर शहर 476, राहाता 195, संगमनेर 154, श्रीरामपूर 193, नेवासे 57, नगर तालुका 93, पाथर्डी 140, अकोले 28, कोपरगाव 202, कर्जत 25, पारनेर 65, राहुरी 79, भिंगार 31, शेवगाव 69, जामखेड 94, श्रीगोंदे 69, मिलीटरी हॉस्पिटल 5, आणि इतर जिल्ह्यातील 21 जणांना कोरोना संसर्गाचे निदान झाले. जिल्हा रुग्णालयानुसार 823, खाजगी प्रयोगशाळेनुसार 902 आणि रॅपिड चाचणीमध्ये 271 जणांना कोरोना संसर्गाचे निदान झाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post