नगर शहरात मोठा ‘कहर’, आज जिल्ह्यात ‘इतक्या’ हजार नवीन रूग्णांची भर

 नगर शहरात मोठा ‘कहर’, आज जिल्ह्यात ‘इतक्या’ हजार नवीन रूग्णांची भर

नगर : नगर जिल्ह्यात करोनाचे थैमान कायम असून चोवीस तासात सुमारे 1800 नवीन बाधित आढळून आले आहेत. नगर शहरात तर मोठा विस्फोट पहायला मिळत असून चोवीस तासात एकट्या नगर शहरात 666 नवीन बाधितांची भर पडली आहे. चोवीस तासात जिल्ह्यात तब्बल 1842 नवीन रूग्णांची भर पडली आहे. 

अहमदनगर शहर 666, राहाता 141, संगमनेर 113, श्रीरामपूर 150, नेवासे 54, नगर तालुका 129, पाथर्डी 59, अकोले 69, कोपरगाव 109, कर्जत 33, पारनेर 61, राहुरी 64, भिंगार 25, शेवगाव 94, जामखेड 23, श्रीगोंदे 25, मिलीटरी हॉस्पिटल 4, आणि इतर जिल्ह्यातील 23 जणांना कोरोना संसर्गाचे निदान झाले. जिल्हा रुग्णालयानुसार 672, खाजगी प्रयोगशाळेनुसार 580 आणि रॅपिड चाचणीमध्ये 590 जणांना कोरोना संसर्गाचे निदान झाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post