करोनाचा आजपर्यंतचा मोठा उद्रेक, ‘इतक्या’ हजार नवीन रूग्णांची भर

 


करोनाचा आजपर्यंतचा मोठा उद्रेक, 1800 नवीन रूग्णांची भर



नगर : नगर जिल्ह्यात करोनाचे थैमान कायम असून सलग सहाव्या दिवशी एक हजाराहून नवीन बाधित आढळून आले आहेत. मागील चोवीस तासात जिल्ह्यात तब्बल 1800 नवीन रूग्णांची भर पडली आहे. यात सर्वाधिक रूग्ण नगर शहरात आढळून आले आहेत. नगर शहरात चोवीस तासात 456 बाधितांची भर पडली आहे. 


अहमदनगर शहर 456, राहाता 208, संगमनेर 71, श्रीरामपूर 134, नेवासे 72, नगर तालुका 107, पाथर्डी 136, अकोले 62, कोपरगाव 110, कर्जत 73, पारनेर 51, राहुरी 87, भिंगार 81, शेवगाव 37, जामखेड 44, श्रीगोंदे 36, आणि इतर जिल्ह्यातील 36 जणांना कोरोना संसर्गाचे निदान झाले. जिल्हा रुग्णालयानुसार 434, खाजगी प्रयोगशाळेनुसार 882 आणि रॅपिड चाचणीमध्ये 484 जणांना कोरोना संसर्गाचे निदान झाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post