माध्यमिक शिक्षकांना दिलासा...17 कोटी रुपये या सभासदांच्या खाती वर्ग

 माध्यमिक शिक्षकांना दिलासा...17 कोटी रुपये या सभासदांच्या खाती वर्ग नगर - 12 हजार सभासद असलेल्या अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीने सभासदांना कायम ठेवीवरील व्याज व वर्गणीवरील व्याज दिले आहे. 17 कोटी रुपये या सभासदांच्या खाती वर्ग करण्यात आले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासुन शिक्षकांचे पगार रखडल्याने आर्थिक अडचणीत असलेल्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

माध्यमिक शिक्षक सोसायटी दरवर्षी वार्षिक सभेनंतर ठेवीवरील व्याज, वर्गणीवरील व्याज व डिव्हीडंडचे वाटप करत असते. हे साधरणत: जूनमध्ये वाटप होते. परंतु गेल्या वर्षी कोव्हिडमुळे वार्षिक सभा वेळेत घेता न आल्याने काही काळानंतर ते वाटप करण्यात आले. मात्र यावर्षीही सर्वसाधारण सभा कधी होईल हे अनिश्चित असल्याने सोसायटीच्या संचालक मंडळाने ठरावाद्वारे ठेवीचे व्याज व वर्गणीचे व्याज देण्याचा निर्णय घेतला व सर्वसाधारण सभेच्या अगोदर देण्यात आले. आर्थिक वर्ष संपल्याबरोबरच सोसायटीने सभासदांच्या बँक खाती ठेवीवरील व्याज व वर्गणीवरील व्याज वेळेत वर्ग केले. सभासदांना ठेवीवरील व वर्गणीवरील व्याज 5.71 टक्के प्रमाणे काढून माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या मुख्य शाखेसह 13 शाखंमधून सभासदांच्या खाती वर्ग करण्यात आले आहे. यामुळे आर्थिक चणचण दूर होण्यास मदत झाल्याने सर्व संचालक मंडळाचे सभासदांनी आभार मानले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post