करोनाचा मेगा संडे.... आजही इतक्या हजार नवीन बाधितांची भर

 करोनाचा मेगा संडे.... आजही इतक्या हजार नवीन बाधितांची भर

जिल्ह्यात १६१७ नवीन बाधितांची भर



नगर :   जिल्ह्यात कोरोना संसर्ग रुग्णांचा आकडा आजही मोठा आहे. गेल्या 24 तासांमध्ये 1 हजार 617 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले. नगर शहरात सर्वाधिक 491 आणि त्याखालोखाल राहाता, राहुरी, श्रीरामपूर येथे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. अहमदनगर शहर 491, राहाता 190 संगमनेर 98, श्रीरामपूर 105, नेवासे 51, नगर तालुका 98, पाथर्डी 52, अकाेले 39, काेपरगाव 77, कर्जत 97, पारनेर 31, राहुरी 126, भिंगार शहर 61, शेवगाव 27, जामखेड 08, श्रीगाेंदे 45, इतर जिल्ह्यातील 20, इतर राज्यातील 01 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले. जिल्हा रुग्णालयानुसार 458, खाजगी प्रयाेगशाळेनुसार 619 आणि रॅपिड चाचणीमध्ये 540 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post