Big Breaking...राज्यात १५ दिवस संचारबंदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

 राज्यात १५ दिवस संचारबंदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणामुंबईः कोरोनाबरोबरच युद्ध पुन्हा सुरू झालंय, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुढीपाडव्याच्या निमित्तानं जनतेला संबोधित करताना कोरोनानं राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीची विदारकता त्यांनी सांगितली. 

राज्यात 144 कलम 

राज्यात 144 कलम लागू करण्यात आलं असून, पुढील 15 दिवस संचारबंदी राहणार आहे. अनावश्यक येण-जाणं पूर्णपणे बंद करण्यात आलेय. अत्यावश्यक काम नसेल तर घराबाहेर पडू देणार नाही. सर्व आस्थापना, सार्वजनिक ठिकाणे बंद राहतील. सकाळी 7 ते रात्री 8 अत्यावश्यक सेवा, सुविधा सुरु राहतील, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. बस, लोकल सेवांसह अत्यावश्यक सेवांसाठी सार्वजनिक वाहतूक सुरु राहणार आहे.  रुग्णालय, वैद्यकीय सेवा, वाहतूक सप्लाय चेन, लस उत्पादक आणि वाहतूक करणारे, मास्क, जंतूनाशक उत्पादक आणि वितरक, जनावरांचे दवाखाने, बस, ऑटो, राजनैतिक कार्यालये, पावसाळी कामे सुरु राहतील, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post