गावांसाठी आनंदाची बातमी...15 व्या वित्त आयोगाचा 1456 कोटींचा निधी वितरित

 

गावांसाठी आनंदाची बातमी...15 व्या वित्त आयोगाचा 1456 कोटींचा निधी वितरित



मुंबई : कोरोनाने पुन्हा धुमाकूळ घातला असताना  सरकारने गावांमध्ये सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी मोठा निधी देण्याची घोषणा केलीय. पंधराव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांसाठी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी निधीची घोषणा केली आहे. 

पंधराव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांसाठी अजून 1 हजार 456 कोटी 75 लाख रुपयांचा बंधीत (टाईड) निधी प्राप्त झाला आहे. हा निधी जिल्हा परिषदांना वर्ग करण्यात येत असून तिथून तो तत्काळ पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींना वितरीत करण्यात येईल, अशी माहिती मुश्रीफ यांनी दिली आहे. 

राज्यामधील ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांना अनुक्रमे 80:10:10 प्रमाणे पंधराव्या वित्त आयोगाचा निधी वितरित करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार वित्तीय वर्ष 2020-21 करिता एकुण 5 हजार 827 कोटी रूपये निधी मंजूर आहे. यापैकी यापुर्वी 4 हजार 370 कोटी 25 लाख रूपये इतका निधी प्राप्त झाला होता. तो जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींना वर्ग करण्यात आला आहे.

आता उर्वरित 1 हजार 456 कोटी 75 लाख रुपयांचा बंधीत (टाईड) निधी मिळाला असून यामुळे 2020-21 या आर्थिक वर्षात मंजूर असलेला संपूर्ण निधी प्राप्त झाला आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post