नगर शहरात आजही मोठ्या संख्येने रुग्णांना डिस्चार्ज.... जिल्ह्यात 'इतक्या' हजार रूग्णांना डिस्चार्ज

 *दिनांक १३ एप्रिल, २०२१*


*आज १३५२ रूग्णांना डिस्चार्ज तर  नव्या २६५४ बाधितांची रुग्ण संख्येत भर*

 

*रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८७.०८ टक्के*अहमदनगर: जिल्ह्यात आज १३५२ रुग्णांना  रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ५ हजार १०१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.०८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २६५४ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १४२६४ इतकी झाली आहे.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ६५१, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ५८२ आणि अँटीजेन चाचणीत १४२१ रुग्ण बाधीत आढळले.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 1१८, अकोले ७२, जामखेड १९, कर्जत ४४, कोपरगाव ०९, नगर ग्रामीण ३०, नेवासा ०७, पारनेर ४५, पाथर्डी ३६, राहता ३०, राहुरी ११, संगमनेर ९८,  शेवगाव २८, श्रीगोंदा २८, श्रीरामपूर ३६, कॅंटोन्मेंट बोर्ड ३०, मिलिटरी हॉस्पिटल ०७ इतर जिल्हा इतर जिल्हा ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.


खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २९८, अकोले ०५, जामखेड ०५, कर्जत ०६, कोपरगाव १०, नगर ग्रामीण ३५, नेवासा १९,  पारनेर ०४, पाथर्डी ०३, राहाता ८१,  राहुरी १४, संगमनेर ३०, शेवगाव ०२, श्रीगोंदा ११, श्रीरामपूर २५, कॅंटोन्मेंट बोर्ड २७ आणि इतर जिल्हा ०७ अशा रुग्णांचा समावेश आहे.


अँटीजेन चाचणीत आज १४२१ जण बाधित आढळुन आले. मनपा ६०, अकोले ६८, जामखेड ०९, कर्जत ११२, कोपरगाव २७५, नगर ग्रामीण ४०, नेवासा ८८, पारनेर ७०, पाथर्डी ७५,  राहाता १०४, राहुरी १२६, संगमनेर ९१, शेवगाव ६२, श्रीगोंदा ८५, श्रीरामपूर १३९, कॅन्टोन्मेंट बोर्ड १४ आणि इतर जिल्हा ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.


दरम्यान, आज  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये

मनपा ५६८, अकोले ५२, जामखेड ०२, कर्जत ०२,  कोपरगाव ६१, नगर ग्रामीण ९०, नेवासा १७, पारनेर १०, पाथर्डी ४५, राहाता १९५, राहुरी ७७, संगमनेर ९७,  शेवगाव २०,  श्रीगोंदा ०५,  श्रीरामपूर ७५, कॅन्टोन्मेंट २४ आणि मिलिटरी हॉस्पिटल १२ अशा रुग्णांचा समावेश आहे.


*बरे झालेली रुग्ण संख्या:१,०५,१०१*


*उपचार सुरू असलेले रूग्ण:१४२६४*


*मृत्यू:१३३४*


*एकूण रूग्ण संख्या:१,२०,६९९*


(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)


*घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा*


*प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा*


*स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या*


*अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा*

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post