नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत मोठा निर्णय

 नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांचीही परीक्षा नाही



मुंबईः गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार नाही, परीक्षेविनाच त्यांना उत्तीर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षण विभागानं दिलीय. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने राज्याच्या शिक्षण विभागानं हा मोठा निर्णय घेतलाय. या आधी ही परीक्षा ऑनलाईन घेण्यात यावी, अशा सूचना होत्या. मात्र त्यावर पुन्हा एकदा विचार करण्यात आलाय. आता  नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविनाच पास केलं जाणार आहे, असा निर्णय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतलाय

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post