कृषी क्षेत्रासाठी आनंदाची बातमी...यंदा सरासरीच्या 103 टक्के पावसाचा अंदाज

कृषी क्षेत्रासाठी आनंदाची बातमी...यंदा सरासरीच्या 103 टक्के पावसाचा अंदाज यंदा मान्सून समाधानकारक बरसणार आहे. सरासरीच्या 103 टक्के पाऊस पडेल, असा अंदाज स्कायमेट संस्थेने वर्तवला आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने उद्योग-व्यवसायांच्या अर्थचक्राला तडाखे बसत असताना आलेला मान्सूनचा अंदाज अर्थव्यवस्थेसाठी दिलासादायक आहे.  सरासरीच्या 90 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला, तर त्याला कमकुवत मान्सून म्हटले जाते. 90 ते 96 टक्क्यांदरम्यान झालेला पाऊस कमकुवत ते सामान्य यादरम्यानच्या गटात मोडतो. पाऊस 96 ते 104 टक्क्यांदरम्यान असेल, तर तो सामान्य मानला जातो. 104 ते 110 टक्क्यांपर्यंत झालेला पाऊस सामान्य ते चांगला पाऊस मानला जातो. 110 टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाल्यास ती अतिवृष्टी मानली जाते. देशात भारतीय हवामान खात्याबरोबरच स्कायमेट ही खासगी संस्थाही दरवर्षी मान्सूनचा अंदाज वर्तवत असते. नुकतेच या संस्थेने मान्सूनच्या दीर्घकालीन अनुमानाविषयी माहिती दिली असून चालू वर्षी भारतात सरासरीच्या 103 टक्के पाऊस पडण्याची शक्यता संस्थेने वर्तवली आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post